आज आपण अशी एक कहाणी बघणार आहोत जी प्रत्येक स्त्री ची आहे. आज आपल्या समाजात असं बोललं जातं की स्त्री पुरुषांच्या खांध्याला खांदा लावून काम करते, स्त्री पुरुष समान मानले जाते पण असे खरंच आहे का? हा एक मोठा प्रश्नचं आहे.
स्त्री कितीही शिकलेली असली,कितीही मोठया नोकरीवर असली तरी तिला चूल आणि मूल सुटले आहे का हो?नेहमी स्त्री ला दुय्यम दर्जा दिला जातो कितीही ladies’ first म्हंटल तरी.
जेंव्हा मुलगी लहान असते तेंव्हा आई बाबा जे बोलतात तेच करावे लागते. आई बाबा नेहमीच चांगलाच विचार करतात त्यानंतर जेंव्हा मुलगी लग्न होऊन सासरी येते तेंव्हा, तेंव्हा काय सगळ्यांचे बंधन असं नाही की सगळेच तसे असतात पण स्त्री ला नेहमीच दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार चालावे लागते. तिला असे स्वतःचे अस्तित्व जगायला मिळते का?जी स्त्री घरी राहून संपूर्ण संसार सांभाळते, चार भिंतीच्या आत राहून सगळ्यांची काळजी घेते.
त्या स्त्रीला कितपत महत्व मिळते. दिवस सुरु होताचं तिची धावपळ सुरु होते नवऱ्याला हे हवं, मुलांना ते हवं, सासु सासर्यांना हे आवडतं हे सगळं बघता बघता ती स्वतःला काय आवडतं हेचं विसरून जाते.
चौवीस तास on ड्युटी वर ती असते.पण तरीसुद्धा तिला विचारले जाते घरात बसून तुला काय काम असते. पण तिला हे विचारले जातं नाही की तु दिवस भर काम करून दमली असशील, काय खाल्ली तरी आहेस का? आराम कर असे म्हणणारे क्वचितचं असतात.
नाही तर बऱ्याच वेळा असही बोलले जाते तुला काही कमी पडतंय का? चार भांडी घासायला सुद्धा रडतेस काय काम करतेस दिवस भर आम्ही काम करून येतो चार पैसे कमवून घर चालवतो तु काय करतेस घरात बसून एवढं पण नाही करता येतं का? अशा बऱ्याचं गोष्टी जी घरी असते काही कमवत नाही तिला नेहमी बोलले जाते असं का?
ती जी दिवसभर घरात सगळ्यांसाठी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचं काम काही संपत नाही तरीही तिला का बोलले जाते ती माणूस नाही आहे का? की फक्त काम करण्याचं मशीन आहे. तिला मन नाही का? तिला स्वतःची आवड निवड जपण्याचा अधिकार नाही का?का ती स्वतःच्या मर्जीने काही करू शकत नाही.
एक रुपया जरी खर्च करायचा असला तरी तिला विचारावे लागते असं का? कारण ती संपूर्ण दिवस भर घरी असते म्हणून ती बाहेर जाऊन पैसे कमवत नाही म्हणून स्वतःच्या पायावर घर सांभाळता सांभाळता स्वतःच्या पायावर उभे राहायचे विसरते म्हणून, स्वतःची स्वप्ने विसरून सगळ्यांची स्वप्ने कशी पूर्ण होणार आहेत त्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करते म्हणून का तिला विचारले जाते तु कुठे काय करतेस, तुला काय कळतं हे कितपत योग्य आहे. बऱ्याचं वेळा बोललं जातं की बायकांचा गुढग्यात मेंदू असतो म्हणून खरंच तस असतं तर तिने किचन मध्ये जेवणात नवीन प्रयोग केले नसते.
प्रत्येकाला आठवड्याची सुट्टी असते पण तिला असते का हो सुट्टी उलट सुट्टीच्या दिवशी तिला जरा जास्तीचीचं काम असतात कारण सुट्टी म्हंटल की प्रत्येकाचा आरामाचा दिवस आणि तिचा full day कामाचा दिवस तिला कोणी सांगत का की आज तु पण आमच्या सोबत सुट्टी घे म्हणून नाही ना शंभर मधल्या दहा घरातचं असं काहीतरी होतं असेल तिला समजून घेतले जातं असेल.
बऱ्याचं वेळा अनेक ठिकाणी तिने कोणाशी बोलायचे कोणाशी नाही, काय करायला पाहिजे अशा गोष्टी सुद्धा दुसरेचं ठरवतात. चार भिंतीच्या आत ती दिवसभर घरी असते.
का तिला समजून घेतले जातं नाहीकोणत्या भाजीत काय घातलं तर ती स्वादिष्ट होईल, काय प्रयोग केला तर पदार्थ चांगला होईल असे अनेक प्रयोग ती करत असते याला तुम्ही काय म्हणाल संपूर्ण घर ती सांभाळते, कुठली वस्तू कुठे ठेवली आहे हे तिला अचूक माहिती असते मग तिचा गुढग्यात मेंदू कसा हेचं नाही समझत.
जेंव्हा तिचीच मुले मोठी होतात आणि त्यावेळी ती आपल्या मुलांना काही सांगायला जाते तेंव्हा तिला बोललं जातं की तुला काय कळतंय अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लिहाव्या तेवढ्या कमीचं आहेत स्त्री ला तिचे असे आयुष्य नाही का?तिला तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा अधिकार नाही का?काही चुकीचं बोलले असले तर माफ करा पण ही सत्य परिस्थिती आहे सगळ्यांची काळजी घेता घेता ती स्वतःची काळजी घ्यायचीचं विसरून जाते.
कितीही केलं तरी ती कुठे काय करते? तिच्या सुद्धा काही आशा आकांशा असतील म्हणून, स्त्री चे काम स्त्रीनेचं केलं पाहिजे अशी समजूत समाजात आहे. हे बरोबर आहे का? केंव्हा सगळ्यांना समजणार स्त्री म्हणजे काम करण्याचं फक्त साधन नाही आहे तिच्या सुद्धा केंव्हा तरी मनाचा विचार करा.
बोलण्यासारखं बरंच काही आहे पण आता थांबते पुढच्या कथा मध्ये सांगेन तुम्हाला हे स्त्री बद्दलचे विचार कसे वाटले नक्की comment मध्ये सांगा. धन्यवाद