कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा बावडा–लाईन बाजार येथे कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक …

0
83

कोल्हापूर | प्रतिनिधी : श्रीकांत शिंगे

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर कसबा बावडा–लाईन बाजार येथील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (दि. २८ डिसेंबर २०२५) कसबा बावडा येथे पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीसाठी संघटितपणे आणि सक्रिय राहण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.या बैठकीला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, डीवायपी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, ऋतुराज संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, यंदाची महापालिका निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे अत्यंत आव्हानात्मक आहे.

वैयक्तिक मतांपेक्षा संघटित प्रयत्न, कार्यकर्त्यांची एकजूट आणि घराघरात पोहोचणारे काम यावरच यश अवलंबून आहे.कोल्हापूरच्या जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो केवळ शब्दांमुळे नव्हे तर प्रत्यक्ष विकासकामांमुळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा विश्वास टिकवण्यासाठी आणि अधिक बळकट करण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.बैठकीत स्थानिक प्रश्न, विकासकामांचा आढावा, नागरिकांच्या अपेक्षा तसेच निवडणूक रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात प्रत्येक प्रभागात समन्वय साधून नियोजनबद्ध काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.या बैठकीस श्रीराम संस्थेच्या सभापती सौ. शीतल पाटील, उपसभापती सुभाष गदगडे, संचालक संतोष पाटील, राजू चव्हाण, उमाकांत उलपे, विलास वाडकर यांच्यासह कसबा बावडा परिसरातील अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here