पुढच्या महिन्यात मोठी घटना, पेट्रोल होणार स्वस्त? दर इतक्या रुपयांनी होणार कमी?

0
64

अयोध्येतील भव्य राम मंदिरात नुकतीच रामलल्लाची थाटामाटात प्राणप्रतिष्ठा झाली. त्या निमित्ताने देशभर पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. पण देशातल्या नागरिकांना आता खरोखर एका वेगळ्या दिवाळीची प्रतीक्षा आहे.

देशात लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकांपूर्वी स्वस्ताई येणार का? कर्जाच्या हप्त्यांची रक्कम कमी होणार का? असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत.

देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ आलं आहे. एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प असल्यामुळे त्याच्याकडून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. आरबीआय कर्जांच्या व्याजदरात काही कपात करेल का, याकडेही जनतेचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर नुकत्याच आलेल्या काही बातम्यांवरुन तेल उत्पादक कंपन्यांना डिसेंबरच्या तिमाहीत झालेला नफा हा सुमारे 75 हजार कोटी रुपये एवढा प्रचंड होता. त्याचाच परिणाम म्हणून या कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कपात होणार अशी माहिती या बातम्यांमधून समोर येत आहे. खरोखर अशी दरकपात होणार का, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. या प्रश्नांच्या उत्तरांची प्रतीक्षा नागरिकांना आहे.

सात फेब्रुवारीला आरबीआयची पहिली मॉनिटरी पॉलिसी मीटिंग होणार आहे. त्यापूर्वी 31 जानेवारीला अमेरिकन फेडची पॉलिसी प्रसिद्ध होईल. फेड आपल्या पॉलिसी रेटमध्ये सुमारे 0.25 टक्के एवढी कपात करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसं झालंच तर आरबीआय पॉलिसी रेटमध्ये कपात करेल का असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. शिवाय आरबीआयच्या बैठकीनंतर लगेचच निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करु शकतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काही दिलासादायक बदल होणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या वर्षभरात आरबीआयने पॉलिसी रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे आता सरकारही आरबीआयकडून पॉलिसी रेटमध्ये कपातीची अपेक्षा करु शकतं, जेणेकरुन निवडणुकांपूर्वी सर्वसामान्य नागरिकांवरील कर्जाच्या हप्त्याचा ताण किमान काही प्रमाणात तरी कमी व्हावा. दुसरीकडे तेल उत्पादक कंपन्यांना चांगलाच नफा झाला आहे. पेट्रोलला लिटरमागे 11 रुपये तर डिझेलला लिटरमागे सहा रुपये नफा होत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेल पाच ते दहा रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here