

पूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी व श्री धीरजकुमार बच्चू यांच्या शुभहस्ते उदघाटन…सहज योजना टेक्नॉलॉजी प्रा. लि., कोल्हापूरचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर :तंत्रज्ञानाच्या नव्या युगात कोल्हापूर जिल्ह्यातील “सहज योजना टेक्नॉलॉजी प्रा. लि. या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या भव्य उद्घाटन समारंभाचा सोहळा दिनांक २५ ऑक्टोबर २०२५, शुभ कृष्ण चतुर्थी या मंगल दिवशी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडला.हा सोहळा पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी (४९ वे मठाधिपती, श्री सिद्धगिरी संस्था, कणेरी)आणि श्री धीरजकुमार बच्चू (अतिरिक्त पोलीस अधीक्षक, कोल्हापूर)यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मंत्रोच्चारांनी झाली.

पूज्य स्वामीजींनी आपल्या आशीर्वचनात सांगितले की —> “नव्या पिढीने तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ उद्योगासाठीच नव्हे तर समाजउन्नतीसाठी करावा, हेच खरे यश आहे.”त्याचप्रमाणे श्री धीरजकुमार बच्चू यांनी या निमित्ताने बोलताना सांगितले की —> “सहज योजना टेक्नॉलॉजीसारखे उपक्रम कोल्हापूरसारख्या प्रगत जिल्ह्यात तंत्रज्ञानातील संधींचे नवीन दरवाजे उघडतात.”या कंपनीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल योजना, सॉफ्टवेअर सोल्यूशन्स, आयटी कन्सल्टिंग आणि विविध टेक-सेवा क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण कार्य केले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या प्रतिनिधींनी दिली.उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, सहकार्यकर्ते व शुभेच्छुकांनी या नव्या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की —> “हा उपक्रम तंत्रज्ञानातील नव्या संकल्पना आणि नव्या यशाची सुरुवात आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त तंत्रज्ञान सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे.”कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांच्या सहभागाने आणि सकारात्मक ऊर्जेने कार्यक्रमाला एक आगळी वेगळी उंची प्राप्त झाली.“सहज योजना टेक्नॉलॉजी प्रा. लि.” – नव्या तंत्रज्ञानाची, नव्या संकल्पांची आणि नव्या यशाची सुरुवात!



