

कोल्हापूर:- दि २५ आक्टोंबर प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही शेंडा पार्क येथेक्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) साळवे प्रतिष्ठान तर्फे व आरोग्य सेवक ख्रिश्चन एकता मंचचे कार्याध्यक्ष जॉन भोरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) साळवे प्रतिष्ठानचे सल्लागार, सिटी क्रिमिनलचे मा अध्यक्ष अँड दत्ताजीराव कवाळे यांच्या उपस्थितीत कुष्ठरोगी बांधवांसोबत केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच कुष्ठरोगी बांधवांना फळे व धान्य स्वरूपात मदत करण्यात आली यावेळी प्रतिष्ठानचे सचिव विनायक पाटील, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक महसूल चे संचालक गजानन कुरणे,राजेंद्र जोशी,अब्दुल शेख, प्रतिष्ठानचे सदस्य सतीश रास्ते,क्रिस्टी भोरे, ग्रेस जॉनभोरे ,सिस्टर चांदा खुडे,ब्रदर रमेश खुडे,विकी शिंदे,प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य,ओंकार लोंढे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे,आदि उपस्थित होते


