विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्याचा मंत्र; विवेकानंद कॉलेजमध्ये आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
40

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. कल्पना कांबळे यांनी केले. त्या विवेकानंद कॉलेज येथे आयोजित वार्षिक आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
“आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे; तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे सुदृढ असणे होय. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली हा उत्तम आरोग्याचा पाया आहे,” असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय थोरात होते. प्रास्ताविकात प्रा. शिल्पा भोसले यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत योग, व्यायाम व खेळ यांचा अवलंब करावा, असे आवाहन केले.

शिबिरात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. गीतांजली साळुंखे, प्रा. बी. एस. कोळी, प्रा. एम. आर. नवले, प्रा. शुभांगी पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी गायकवाड यांनी केले, तर आभार प्रा. उत्तम तिजाईकर यांनी मानले.
आरोग्य जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here