संजीवनमध्ये गाडगे बाबा जयंती निमित्त स्वच्छता अभियान

0
32

पन्हाळा : येथे गाडगे बाबा यांच्या जयंती निमित स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

पन्हाळा : प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मधील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सुरुवातीला कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजीव जैन, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. एकनाथ साळोखे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. रणजीत इंगवले, डॉ. गजानन कोळी आणि रजिस्ट्रार दीपक पाटील यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहसमन्वयक प्रा. सुशील साळोखे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. त्यानंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्याकडून कॉलेज परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी जमा केलेल्या कचऱ्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. कार्यक्रमाला प्रा. सरदार देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी विभागप्रमुख डॉ. विनायक देवकर, प्रा. सचिन पिसाळ, प्रा. सम्राट बाबर, प्रा. प्रवीण अतिग्रे, प्रा. श्रीवल्लभ चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख संग्राम पाटील, लेखापाल कृष्णात शिंदे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here