
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूरचा अभिमान कोल्हापूर | प्रतिनिधी खरंच विश्वास बसत नाही… पण हे शंभर टक्के सत्य आहे. ज्या वयात मुले नीट उभी राहायला शिकतात, त्या कोवळ्या वयात एका चिमुकल्याने पायात स्केट्स बांधून जगासमोर अभूतपूर्व यशाची झेप घेतली आणि अवघ्या सातव्या वर्षी त्याच्या नावापुढे “डॉ.”ही बिरुदावली लागली. हे नाव आहे — डॉ. केदार विजय साळुंखे आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्री. भूषण गगराणी, गृहराज्यमंत्री ना. सतेज डी. पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते केदारला “ब्रँड कोल्हापूर” या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.

कोल्हापूरच्या मातीने घडवलेल्या या विश्वविक्रमी बालकाचा आज संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतोय. 170 किलोमीटरच्या रॅलीतही झळकली झुंजार वृत्तीकाही दिवसांपूर्वी एका सायकल रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी, स्वतःपेक्षा मोठ्या सायकलवर ठाम उभा असलेला एक चिमुकला दिसला. एकूण प्रवास 170 किलोमीटरचा! मनात शंका निर्माण झाली – एवढा लहानगा हा प्रवास कसा पूर्ण करणार? पण प्रत्यक्षात ते संभ्रम नव्हते, ती केदारची कमाल होती. ज्या हातातली माझी लेखणी थांबली, त्या केदारच्या पायांनी आणि चाकांनी इतिहास लिहिला.असंख्य पदकांचा आणि विक्रमांचा मानकरीकेदार आजवर 20 गोल्ड पदकांचा विजेता 9 सिल्व्हर पदके 9 ब्राँझ पदके 25 हून अधिक जागतिक विक्रमांची नोंद अशी अफाट कामगिरी त्याने केली आहे.

विशेष म्हणजे हे सगळं करताना त्याचं वय केवळ आठ वर्षां आसपास आहे.24 जुलै 2012 रोजी जन्मलेल्या केदारचे वडील विजय साळुंखे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) आणि आई स्वाती गायकवाड-साळुंखे (पोलीस उपअधीक्षक) हे दोघेही कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे केदारला शिस्त, चिकाटी आणि जिद्द हे गुण घरातूनच वारशाने मिळाले. पाळण्यात दिसले विश्वविक्रम”मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” ही म्हण केदारच्या बाबतीत अक्षरशः खरी ठरली. नुकताच तो उभा राहायला शिकत असतानाच त्याच्या पायात स्केट्स बांधले गेले. तो पडला, जखमी झाला, ठेचकाळला देखील, पण तो कधीही थांबला नाही… रडला नाही… मागे फिरला नाही…हिमालयाच्या उंच शिखरांप्रमाणे त्याची जिद्द अढळ राहिली आणि आज तो स्केटिंग आणि सायकलिंग या दोन्ही क्रीडाप्रकारांचा चॅम्पियन बनला आहे.

सोबतच तो फुटबॉल आणि स्विमिंग मध्येही प्राविण्य मिळवतो आहे. समाजासाठी दिले प्रेरणादायी संदेशकेदारने फक्त पदके आणि विक्रमच नाही, तर समाजप्रबोधनाचे मोलाचे कार्यही केले आहे.26 नोव्हेंबर 2018 सांगली ते कोल्हापूर 55 कि.मी. अंतर 3 तास 38 मिनिटात स्केटिंग करत “दहशतवाद थांबवा” संदेश 19 फेब्रुवारी 2020 शिवजयंतीनिमित्त “महिलांवरील अत्याचार थांबवा” संदेशही त्याच्या राष्ट्रप्रेमाची आणि सामाजिक जाणीवेची उदाहरणे आहेत. वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरेट!या सर्व कामगिरीची दखल घेत डॉइसेस ऑफ एशिया, चेन्नई यांनी केदारला अॅथलेटिक्स क्षेत्रात मानद डॉक्टरेट प्रदान केली. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्याच्या नावापुढे “डॉ.” ही पदवी लागली – जी मिळवण्यासाठी अनेकांची अख्खी आयुष्ये संपून जातात.आंतरराष्ट्रीय विक्रमांची नोंदकेदारच्या नावावर आज Children of World Records Asia Pacific Book of Records High Range Book of World Records International Book of World Records Kalam Book of Records Global Book of Records Limca Book of Records Guinness Book of World Recordsअशा नामांकित संस्थांमध्ये विक्रम नोंदवले गेले आहेत. शब्द अपुरे पडतात…या चिमुकल्याच्या कर्तृत्वावर लिहित बसलो, तरी शब्द अपुरेच पडतील. म्हणून आज शेवटी एवढंच…“डॉ. केदार साळुंखे – सलाम तुझ्या जिद्दीला, मेहनतीला आणि राष्ट्रप्रेमाला…!”तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा!


