
श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये अमली पदार्थ सेवन विरोधी मोहीम या विषयावर मार्गदर्शन करताना ए.पी.आय. ए.एन.बाबर समवेत प्रा.एस.पी. कुंभार,किरण पाटील,शिवाजीराव पाटील,डॉ.विजयकुमार पाटील,डॉ. उषा पवार,प्रा.पी.बी.लव्हटे व मान्यवर
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
विद्यार्थ्यांनी तंबाखू,सिगारेट, ड्रग्ज,कोकेण,गांजा,चरस या अंमली पदार्थापासून दूर राहावे कारण याची एकदा सवय लागल्यास त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही याबाबतीत शासनाने कडक कायदे केलेले आहेत या दुष्टचक्रात आपण सापडलो तर आपले करिअर धोक्यात येऊ शकते असे प्रतिपादन पन्हाळा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.ए.एन.बाबर यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथे विद्यार्थी सुरक्षा समिती अंतर्गत अंमली पदार्थ सेवन विरोधी मोहीम या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी मार्गदर्शन करताना ए.पी.आय. ए.एन.बाबर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले पन्हाळा पोलीस स्टेशनची व निर्भया पथकाची वेळोवेळी कॉलेजला भेट असते विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहिले पाहिजे आपले आयुष्य आपणच घडवू शकतो व आपणच बिघडवू शकतो व्यायाम करा,अभ्यास करा आणि आपले आयुष्य सुंदर बनवा.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील, ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ.उषा पवार,माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका टी.के. पाटील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.एस.पी.कुंभार यांनी केले पाहुण्यांची ओळख प्रा.सीमा पाटील यांनी करून दिली आभार प्रा.आर.बी.पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
फोटो ओळ – श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये अमली पदार्थ सेवन विरोधी मोहीम या विषयावर मार्गदर्शन करताना ए.पी.आय. ए.एन.बाबर समवेत प्रा.एस.पी. कुंभार,किरण पाटील,शिवाजीराव पाटील,डॉ.विजयकुमार पाटील,डॉ. उषा पवार,प्रा.पी.बी.लव्हटे व मान्यवर

