
संगीता पाटील व युवराज रंगराव चौगुले यांचे मतदारांशी थेट संवाद
कोतोली | प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार सौ. संगीता शंकर पाटील तसेच पंचायत समितीचे उमेदवार सुनील महिपती चौगुले यांनी आज मतदारसंघात व्यापक प्रचार दौरा करत मतदारांना भेटून विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रचार दौऱ्यात कोलिक, पडसाळी, चाफेफडी, धनगर वाडा, गोठणे, काळजवडे आदी गावांमध्ये ठिकठिकाणी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडले. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांचे औक्षण करत प्रेमळ स्वागत केले.

यावेळी बोलताना उमेदवारांनी गेल्या पाच वर्षांत जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून मतदारसंघात राबविण्यात आलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. रस्ते, पाणीपुरवठा, सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण तसेच मूलभूत सुविधांसाठी केलेल्या कामांचा आढावा मांडण्यात आला.
“यापुढील काळात विकासकामे अधिक गतीने मार्गी लावून कोतोली मतदारसंघाला आदर्श ‘मॉडेल मतदारसंघ’ बनविण्याचा निर्धार आहे,” असे ठाम आश्वासन यावेळी उमेदवारांनी दिले.
या प्रचार दौऱ्यात प्रशांत पाटील, महादेव पाटील, बाजीराव अंगठेकर, दीपक पोवार, सागर वरपे, फुलाजी पाटील, शिवाजी कांबळे, यशवंत पाटील, बाळासो पाटील, अर्जुन पाटील, विलास पाटील, सुभाष पाटील, चंदना पाटील, रिया पाटील, सुरेखा पाटील, तरुणाई पाटील यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व महिलांचा वाढता पाठिंबा पाहता कोतोली मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाची लाट स्पष्टपणे दिसून येत आहे.


