
कोल्हापूर प्रतिनिधी -पांडुरंग फिरिंगे
सडोली खालसा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणारी मोठी घडामोड समोर आली आहे. म्हालसवडे येथील युवा नेते सचिन पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी केली असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः फोन करून निवडणुकीतून माघार घ्यावी, असे आवाहन केले.
या आवाहनाला मान देत युवा नेते सचिन पाटील यांनी कोणत्याही अटी व शर्तींशिवाय राष्ट्रीय पक्षाकडून निवडणूक लढवणारे जिल्हा परिषद उमेदवार क्रांती पोवार यांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे सडोली खालसा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून, निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

या प्रसंगी उद्योजक रवी पाटील (सडोलीकर), के. बी. पाटील भाई, अमित कांबळे शंकर दादू पाटील, विलास भोसले प.स.उमेदवार,एम.पी.पाटील, डॉ.निवास वरपे, संदीप पाटील, सुनिल पाटील, डॉ.टी.एस.पाटील आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जि. प. उमेदवार क्रांती पोवार म्हणाले,
“युवा नेते सचिन पाटील यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला दहा हत्तीचे बळ मिळाले आहे. हा पाठिंबा म्हणजे विकासाच्या राजकारणावर जनतेचा विश्वास आहे.”
सचिन पाटील यांच्या निर्णयामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, येणाऱ्या निवडणुकीत याचे थेट परिणाम मतदानावर दिसून येतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


