
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : नशामुक्त कोल्हापूर या अभियानातर्गंत उदया म्हणजे शनिवार दि . 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . नशामुक्त कोल्हापूर अभियान पंधरवडा 15 ते 29 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी या उपक्रमांर्गंत 28 सप्टेंबर रोजी शहरात 5 किमी रन आणि वॉक (धावणे-चालणे) या उपक्रमाचे जिल्हा प्रशासनातर्फे आयोजन करण्यात आले होते.
तथापि या दिवशी अतिवृष्टी झाल्यामुळे ही दौड ( रॅली) रद्द करण्यात आली होती. या दौडीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
पोलीस परेड ग्राऊंड (कसबा बावडा) ते जिल्हाधिकारी कार्यालय व पुन्हा तिथून पोलीस परेड ग्राऊंड असा हा रन/ वॉक दौडीचा मार्ग राहणार आहे. ही दौड सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली व मोफत आहे. आरोग्य, फिटनेस, नशाबंदी यांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीमध्ये जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवी संस्था, क्रीडा व सामाजिक संघटना तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सामील होणार असून ज्यांनी या रन/वॉक साठी नोंदणी केली नसेल अशा व्यक्तीही स्वयंफुर्तीने या मोहिमेत सामील होवू शकतात. या रन/वॉक मोहिमेत जास्ती जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.
या आढावा बैठकीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा शिरस, सहा. आयुक्त (स.क.) सचिन साळे, माध्य. शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सर्वसाधारण तहसिलदार स्वप्नील पवार, प्रसाद संकपाळ, म.बा.कवटीकतार, डी.सी.कुंभार, योगेश पाटील, चेतन चव्हाण, विलास कदम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
