
प्रतिनिधी : रोहित डवरी
कोल्हापूर, १२ ऑक्टोबर – गेली तेरा वर्षे कोल्हापूर हायकर्स फाउंडेशन आयोजित” एक सांज पन्हाळगडावर” हा एक अनोखा दीपोत्सवाचा उपक्रम यावर्षी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० ते रात्री ११:०० या वेळेत पन्हाळगडावरील शिव मंदिर (सज्जा कोटी) येथे आयोजित करण्यात आला आहे.दरवर्षी वसुबारसच्या संध्याकाळी पन्हाळगडावर हजारो दीप प्रज्वलित करून गड उजळवण्याचा हा उपक्रम कोल्हापूर हायकर्स सातत्याने आयोजित करत आहेत
स्वराज्याचे वैभव, गडकोटांचे सांस्कृतिक महत्व आणि शिवकालीन इतिहास यांचे स्मरण जपण्यासाठी हा दीपोत्सव गेली तेरा वर्षे साजरा केला जातो.
“ज्या गडांनी स्वराज्य निर्माण केलं, त्या गडांनीही दिवाळीचा उजेड अनुभवावा हा हेतू लक्षात ठेवून कोल्हापूर हायकर्स
पन्हाळगडावर दिवाळी साजरी करत असते.
यावर्षी विशेष व्याख्यानासाठी
प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक आणि व्याख्याते मा. श्री. इंद्रजित सावंत यांचे “महाराणी ताराबाईसाहेबांचा दिल्लीपती औरंगजेबाशी लढा” याविषयी व्याख्यान असणार आहे.
तसेच कोल्हापुरातील वीरभद्र मर्दानी आखाडा यांच्यामार्फत शिवकालीन मर्दानीखेळांचे प्रात्यक्षिक:
व युद्धकला सादरीकरण होणार आहे.
हजारो दीपांनी उजळणारा पन्हाळगडाचा मनोहारी नजारा — सर्वांसाठी खुला आणि मोफत आहे

‘कोल्हापूर हायकर्स’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून इतिहास, संस्कृती आणि निसर्ग जपणाऱ्या तरुणांचा समूह आहे.
गड-किल्ल्यांचे संवर्धन, ट्रेकिंगद्वारे इतिहासाचा प्रसार आणि समाजातील तरुणांमध्ये साहसाची व स्वराज्याच्या गौरवाची भावना जागवणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.वर्षभर विविध ट्रेक्स, पर्यावरण संवर्धन, तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून ही संस्था सातत्याने कार्यरत आहे.
या दीपोत्सवात सर्व शिवभक्त, किल्लेप्रेमी आणि नागरिकांनी सहभागी होऊन
स्वराज्याच्या या ऐतिहासिक वारशाला उजळवण्याचे कार्य करावे असे आवाहन कोल्हापूर हायकर्स चे अध्यक्ष व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट
मोंटिनिअरिंग असोसिएशन सचिव सागर श्रीकांत पाटील व कोल्हापूर हायकर्सच्या परिवाराने केले आहे
सर्व शिवप्रेमींनी सायंकाळी सहा पूर्वी खालील ठिकाणी हजर राहावे
📍 स्थळ: शिव मंदिर, पन्हाळगड.
📅 दिनांक: १७ ऑक्टोबर २०२५
⏰ वेळ: सायं. ६:०० ते रा. ११:००
📞 संपर्क: ८२३७०७९९९९ / ७७०७०९०७०९

