
ओबीसी हक्क व सन्मानासाठी भव्य प्रचार फेरीचे आयोजन
कोल्हापूर | प्रतिनिधी: पांडुरंग फिरंगे
ओबीसी समाजाचे हक्क, स्वाभिमान आणि राजकीय प्रतिनिधित्व अधिक भक्कम करण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीने लढवली जात असलेली ही निवडणूक आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, प्रभाग क्रमांक ९ अ मधील एकमेव उमेदवार मान. सचिन कृष्णा सुतार यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस जनतेचा वाढता आणि ठोस पाठिंबा मिळत आहे.
या वाढत्या जनसमर्थनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार फेरीत ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने टू-व्हिलरसह सहभागी होऊन ओबीसी स्वाभिमानाच्या लढ्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ओबीसी समाजाला न्याय, हक्क आणि सन्मान मिळवून देण्याचा निर्धार*
मान. सचिन सुतार हे ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारे आणि सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. प्रभाग क्रमांक ९ अ मधून त्यांना विजयी करण्यासाठी ही प्रचार फेरी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास ओबीसी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
ही फेरी केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता, ओबीसी समाजाच्या एकजुटीचे, ताकदीचे आणि स्वाभिमानाचे प्रभावी दर्शन घडवेल, असा निर्धार सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
ओबीसी जनमोर्चा व पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग**
सदर आवाहन ओबीसी जनमोर्चा, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले असून,
शिवाजी माळकर, एकनाथ कुंभार, चंद्रकांत कोवळे, पंडित परीट, योगेश कुंभार, किशोर लिमकर, मोहन हजारे, अनिल खडके, सद्दाम मुजावर, सुनील महाडेश्वर यांच्यासह सर्व पदाधिकारी या प्रचार फेरीत सक्रिय सहभागी होणार आहेत.
तसेच ओबीसी बहुजन आघाडीचे दिगंबर लोहार (सहसचिव) व सयाजी झुंजार (राज्य सचिव) यांनीही समाजबांधवांना मोठ्या संख्येने या प्रचार फेरीत सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
मान. सचिन सुतार यांना जाहीर पाठिंबा – समर्थनाची व्याप्ती वाढतेय*
दरम्यान, उंड्री येथील सुतार-लोहार उन्नती समाजाचे पन्हाळा तालुका अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ओबीसी समाज कार्यकारणी सदस्य श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल सुतार यांनी मान. सचिन सुतार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
संजय सुतार वाघवे यांच्यासह फुलेवाडी परिसरातही जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
“जय ओबीसी!”च्या घोषणांनी दुमदुमणार प्रभाग ९
जय ओबीसी! या जोरदार घोषणांनी निनादणारी ही प्रचार फेरी ओबीसी समाजाच्या ताकदीचे, एकजुटीचे आणि राजकीय सजगतेचे ऐतिहासिक दर्शन* घडवेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये ओबीसी स्वाभिमानाची ही लढाई आता निर्णायक वळणावर पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

