🔴 BREAKING NEWS-कर्नाटकात भीषण अपघात; कोल्हापूर ACB च्या DYSP वैष्णवी पाटील जखमी, दोघांचा मृत्यू..

0
181

चित्रदुर्ग | प्रतिनिधी- मेघा पाटील

कोल्हापूर अँटी-करप्शन ब्यूरो (ACB) मधील उपअधीक्षक (DYSP) वैष्णवी पाटील यांच्या कारला कर्नाटकातील **चित्रदुर्गजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू,तर वैष्णवी पाटील यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात रविवारी पहाटे सुमारे ४ वाजता घडला. बेंगळुरूहून कोल्हापूरकडे येत असताना त्यांच्या कारची लॉरीशी जोरदार धडक झाली. जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मृत व्यक्तींची अधिकृत ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here