
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
शैक्षणिक संशोधन, वैचारिक देवाणघेवाण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला चालना देणाऱ्या राष्ट्रीय चर्चासत्रात ‘विवेक रिसर्च जर्नल’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. या प्रसंगी संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. माधवी जाधव, डॉ. आरिफ महात, डॉ. मालोजी जगताप, डॉ. दीपक तुपे आणि डॉ. देवीदास बामणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे आणि सी.ई.ओ. मा. कौस्तुभ गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे हा शैक्षणिक उपक्रम संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, रोपाला पाणी घालून पर्यावरणपूरक संदेश देत तसेच शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने करण्यात आली. चर्चासत्राचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख हिंदी विभागप्रमुख तथा समन्वयक डॉ. आरिफ महात यांनी प्रभावीपणे करून दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले, तर सहसमन्वयक डॉ. दीपक तुपे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. समिक्षा फराकटे व प्रा. निलेश जाधव यांनी नेटकेपणाने पार पाडले.
या राष्ट्रीय चर्चासत्रात बिहार, केरळ, दिल्ली, हरियाना व महाराष्ट्र या राज्यांतील नामवंत संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वैचारिक मंथन, संशोधनपर सादरीकरणे आणि शैक्षणिक संवादामुळे हे चर्चासत्र राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवणारे ठरले.

