
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना देत ग्रामपंचायत माळवाडी (को.) यांच्या वतीने रेणुका मल्टिप्लेक्स हॉस्पिटल व गद्रे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह नेत्र तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे अनेक नागरिकांना आजारांचे वेळीच निदान होऊन योग्य उपचारांचा लाभ मिळाला.या कार्यक्रमास प्रभारी सरपंच सागर पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष सरदार खोत, युवा नेते विजय खोत, सामाजिक कार्यकर्ते बळवंत गायकवाड, रवी किरण खोत, सरदार गायकवाड, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी उमा पाटील मॅडम, सीआरपी रूपाली पाटील, आशा सेविका कल्पना यादव, अश्विनी खोत, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी निवृत्ती चौगुले, सचिन रायकर, सुरज सर्वगोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. अनिल पाटील, डॉ. प्रकाश मगदूम, डॉ. सचिन खाडे व त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले.ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याबाबत जागृती निर्माण झाली असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची उद्दिष्टे प्रत्यक्षात साकार होत असल्याचे चित्र दिसून आले.

