
ममता दिनानिमित्त श्रद्धांजली व शब्दोत्सव कार्यक्रम
ममता दिनानिमित्त स्व. मीनाताई ठाकरे जयंतीनिमित्त शब्दोत्सव व गौरव सोहळा संपन्न
उंब्रज (ता. कराड, जि. सातारा) – प्रतिनिधी : बाहुबली भोसे
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या, शिवसेना कुटुंबाच्या मातृमूर्ती माँसाहेब स्व. सौ. मीनाताई ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती दिनानिमित्त (ममता दिन) हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्र, उंब्रज येथे भावपूर्ण वातावरणात सदिच्छा भेट व गौरव सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी विद्यार्थिनी कु. सोनम खिलारे व कु. साक्षी पवार यांचा ‘शब्दोत्सव २०२५’ दिवाळी अंक भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे स्मरण करत मीनाताई ठाकरे यांच्या मायेची, कुटुंबवत्सलतेची व सामाजिक योगदानाची आठवण उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी ‘माझ्या काही आठवणी’ या शीर्षकाखाली शिवसेनाप्रमुखांशी संबंधित संस्मरणीय क्षण मांडण्यात आले. त्यात २३ जानेवारी २००६ रोजी शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त STD बुथमधून केलेल्या शुभेच्छा फोनचा बिल हा भावनिक ठेवा असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच २३ जानेवारी २०१२ रोजी शिवसेनाप्रमुखांचे अंगरक्षक मास्टर थापा यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या रुद्राक्ष तुळा कार्यक्रमात ६२ किलो वजनातील २२,२३४ रुद्राक्षांपैकी दोन रुद्राक्ष आशीर्वादरूपाने मिळाल्याचा अनुभव सांगण्यात आला.
प्रितीसंगम नाट्यसंमेलन, कराड (१ फेब्रुवारी २००४) येथे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी काढलेले व्यंगचित्र — “महेश असेल शिवसैनिक, मोजपट्टी लावून पहा” — याचाही उल्लेख करण्यात आला. तसेच दैनिक सामना (२३ जानेवारी १९८९) चा पहिला अंक आणि मार्मिक चा पहिला अंक शिवसेनाप्रमुखांनी पाहून व्यक्त केलेले आश्चर्य उपस्थितांसमोर मांडण्यात आले.
‘दैनिक सामना’ संग्रह हा येणाऱ्या नवीन पिढीसाठी शिवसेना व शिवसेनाप्रमुखांचे विचार समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून, शिवसेना व शिवसेनाप्रमुखांवर PhD करणाऱ्या अभ्यासकांसाठीही तो महत्त्वाचा संदर्भ ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच ‘Trail of the Tiger’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद ‘वाघाच्या पाऊलखुणा’ लिहिताना ‘दै. सामना’ संग्रहाचा मोलाचा उपयोग झाल्याचे सांगण्यात आले. बाळ केशव ठाकरे फोटोबायोग्राफी हा अमूल्य ठेवा अभ्यासकांना उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप ‘जय महाराष्ट्र’ या घोषणांनी झाला.
!! हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख !!
बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्र, उंब्रज
ता. कराड, जि. सातारा


