
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, माळवाडी (कोतोली) संचलित श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, श्रीपतराव चौगुले अध्यापक विद्यालय व डॉ. के. एस. चौगुले आय.टी.आय., माळवाडी-कोतोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय श्रीपतराव चौगुले दादा यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त तसेच संस्थेच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता संपन्न होणार आहे.
या प्रेरणादायी कार्यक्रमास कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, खासदार धैर्यशील माने तसेच एस.पी. न्यूज चॅनेलचे व्यवस्थापकीय संचालक सागर पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती तसेच ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले भूषविणार आहेत.

यावेळी महाविद्यालयाच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा आलेख मांडणाऱ्या ‘ज्ञानामृत : वाटचाल पंचवीस वर्षांची’ या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच स्वर्गीय श्रीपतराव चौगुले दादा यांच्या स्मृतिदिनानिमित्त व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
याचबरोबर महाविद्यालयातील व परिसरातील स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या कर्तृत्वाला सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. जी. टी. पाटील, खजिनदार मारुती श्रीपती चौगुले, सचिव शिवाजीराव पाटील, संचालक सौ. कल्पनाताई चौगुले, प्रकाश भिमराव पाटील, प्रा. वेदिका विजय चौगुले, विजय केरबा चौगुले, डॉ. अजय केरबा चौगुले, डॉ. भालचंद्र रामचंद्र कोरे, डॉ. मीना प्रकाश पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या गुणगौरव व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यास माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले आहे.

