
कोल्हापूर प्रतिनिधी
पांडुरंग फिरिंगे
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप सत्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख प्रा. चंद्रदेव कवडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. जिजाबराव पाटील, मुंबई विद्यापीठाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय मुरुमकर, डॉ. बाबासाहेब कोकाटे तसेच महाराष्ट्र हिंदी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अनिल साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रासाठी बिहार, केरळ, दिल्ली व हरियाना या विविध राज्यांतून नामवंत हिंदी साहित्यिक, अभ्यासक व संशोधक सहभागी होणार असून, विविध विषयांवर सखोल व वैचारिक मंथन होणार आहे. त्यामुळे हे चर्चासत्र हिंदी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
या चर्चासत्राचा लाभ शिक्षणप्रेमी, अभ्यासक, विचारवंत, गुरुदेव कार्यकर्ते तसेच विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य (प्र.) डॉ. एस. पी. थोरात, हिंदी विभागाचे प्रमुख व समन्वयक डॉ. आरिफ महात आणि सहसमन्वयक डॉ. दीपक तुपे यांनी केले आहे.

