
नेहरू विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुरेश लोहार यांचे ठाम प्रतिपादन
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
आजच्या शिक्षणव्यवस्थेत शिक्षकांच्या परिक्षा घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांना संस्कारक्षम, विचारशील व समाजोपयोगी नागरिक घडविणे अधिक गरजेचे आहे. शिक्षकांवर परिक्षांचा बोजा टाकण्याऐवजी त्यांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोकळे सोडले पाहिजे, असे परखड मत नेहरू विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक सुरेश लोहार यांनी व्यक्त केले.
ते नेहरू विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार सत्कार समारंभात बोलत होते. त्यांच्या विचारांनी उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व मान्यवरांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका लक्ष्मी बोरगे यांनी प्रभावीपणे केले, तर सुभाष लव्हटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी विक्रम पाटील व संग्राम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत शिक्षण आणि समाज यातील नाते अधोरेखित केले. कार्यक्रमाचा समारोप कांबळे सर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
या प्रसंगी मुख्याध्यापक सुरेश लोहार यांच्यासहविनायक भोईटे, चेतन जाधव, अरुण सावंत, दीपक पाटील, सागर कांबळे, विक्रांत भिसे,तसेच जेष्ठ शिक्षिका लक्ष्मी बोरगे, सुवर्णा पाटील, सरिता पोवार,शिवाजी कुंभार, व युवराज पाटील यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा सत्कार समारंभ केवळ पत्रकारांच्या गौरवापुरता मर्यादित न राहता, शिक्षणव्यवस्थेच्या भविष्यास दिशा देणारा ठरला. “परिक्षा नव्हे, तर मूल्याधिष्ठित शिक्षणातूनच उद्याचा सक्षम नागरिक घडतो,” हा संदेश या कार्यक्रमातून ठळकपणे पुढे आला.

