
S P -9 प्रतिनिधी मेघा पाटील
पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ३ (लोहगाव – विमाननगर – वाघोली) हा झपाट्याने विकसित होणारा आणि लोकसंख्येने वाढणारा प्रभाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस दृष्टिकोन, आधुनिक शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणाऱ्या सौ. स्नेहा योगेश शिंदे या नागरिकांच्या आशेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.BCA व MBA (लंडन) सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाने सुसज्ज असलेल्या सौ. स्नेहा शिंदे या केवळ प्रशासकीय कौशल्यातच नव्हे, तर सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेणाऱ्या नेतृत्वकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्या शिवदुर्गा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष असून, महिलांचे संघटन, सबलीकरण आणि आत्मनिर्भरतेसाठी सातत्याने कार्यरत आहेत. तसेच त्या पुणे शहर महिला प्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा ठोस ध्यास महिलांना स्वावलंबी बनवणे, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कायदेविषयक जनजागृती, आरोग्य शिबिरे, तसेच मुलींच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन उपक्रम राबवणे, हे सौ. स्नेहा शिंदे यांच्या कार्याचे महत्त्वाचे पैलू आहेत. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य केले आहे.विकासाचा व्यापक दृष्टिकोन प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला व युवकांसाठी विशेष योजना, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणारा विकास आराखडा त्यांचा प्राधान्यक्रम आहे. “विकास केवळ इमारतींचा नव्हे, तर माणसाचा असावा” ही त्यांची भूमिका नागरिकांमध्ये विशेष पसंतीस उतरते आहे.नागरिकांच्या थेट संपर्कातून विश्वासार्ह नेतृत्व लोहगाव, विमाननगर व वाघोली परिसरात सातत्याने जनतेशी संवाद, नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न, तसेच प्रशासनाशी समन्वय साधून कामे मार्गी लावण्याची कार्यपद्धती यामुळे सौ. स्नेहा शिंदे यांचे नेतृत्व अधिक विश्वासार्ह ठरत आहे. नव्या पिढीचे सक्षम व आधुनिक नेतृत्व शिक्षण, अनुभव, सामाजिक जाणिव आणि कार्यक्षमता यांच्या बळावर सौ. स्नेहा योगेश शिंदे या प्रभाग क्रमांक ३ च्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वातून “अखंड प्रभाग – सर्वसमावेशक विकास” ही संकल्पना प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

