विवेकानंद कॉलेजमध्ये प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानातून सामाजिक जाणीवेचा जागर

0
17

कोल्हापूर प्रतिनिधी : जानवी घोगळे
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे संस्थेचे कार्याध्यक्ष तथा मार्गदर्शक प्राचार्य मा. अभयकुमारजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त एनसीसी व एनएसएस विभागामार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा व सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
हे रक्तदान शिबिर छत्रपती प्रमिला राजे सरकारी वैद्यकीय रुग्णालय, कोल्हापूर यांच्या सहकार्याने थेट महाविद्यालय परिसरात आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, युवकांनी समाजाच्या गरजा ओळखून अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

या शिबिरास एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, जबाबदारी आणि सेवाभाव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून साध्य झाले.सदर रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, प्राध्यापक संदीप पाटील, प्रा. बागडी व प्रा. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला.प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या झालेल्या या उपक्रमामुळे “सेवेतून साजरा होणारा वाढदिवस” ही संकल्पना अधिक बळकट झाली असून, विवेकानंद कॉलेजची सामाजिक जाणीव अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here