कोतोलीत कै. कमल विलास लव्हटे पुण्यस्मरणा निमित्त विविध सामाजिक उपक्रम

0
11

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
कोतोली ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. मनिषा सागर लव्हटे या दरवर्षी आपल्या सासूबाई कै. कमल विलास लव्हटे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करीत असतात. यावर्षीही त्यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त महिलांसाठी अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी ‘कुंकूमार्चन’ हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हा कार्यक्रम सौ. मेघा भाबोरीकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

तसेच सुप्रसिद्ध मंगोबा ओवीकार मंडळ, उचगाव यांच्या सादरीकरणातून धनगरि ओव्या या लोककलेचा कार्यक्रम घेण्यात आला. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या ओव्यांमधून आजच्या काळातही लोककला जिवंत ठेवण्याचे अमूल्य कार्य करण्यात आले.या सर्व उपक्रमांमध्ये सौ. मनिषा लव्हटे श्री. सागर लव्हटे यांची मोलाची साथ लाभली.कार्यक्रमप्रसंगी कोतोली गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वनिता प्रकाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. संगीता सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here