महाराष्ट्र केसरी व U-20 कुस्ती स्पर्धेत लक्ष अकॅडमीच्या पैलवानांची घवघवीत कामगिरी ; श्रावणी लव्हटेची चमकदार कामगिरी

0
29

कोल्हापूर | प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात लक्ष अकॅडमीने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे. दि. १५ व १६ रोजी गंगापूर येथे पार पडलेल्या १५ व १७ वर्षाखालील अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत लक्ष अकॅडमीच्या महिला पैलवानांनी उल्लेखनीय यश संपादन करत भविष्यातील महाराष्ट्र केसरींची नांदी दिली आहे.
या स्पर्धेत अकॅडमीच्या खालील पैलवानांनी आपापल्या वजनगटात उत्कृष्ट कामगिरी करत निवड मिळवली –
40 किलो – पै. गौरी पाटील
42 किलो – पै. स्नेहल पाटील
46 किलो – पै. पूर्वा शिपेकर
46 किलो – पै. रोहिणी देवबा
58 किलो – पै. साक्षी पाटील
62 किलो – पै. दुर्गा नाईक
66 किलो – पै. संचिता मोरे
याचबरोबर महाराष्ट्र केसरी निवड चाचणी व २० वर्षाखालील (U-20) अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी लक्ष अकॅडमीच्या दोन पैलवानांनी थेट निवड मिळवून अकॅडमीचा गौरव वाढवला आहे.
50 किलो वजन गट – पै. तृप्ती गुरव
53 किलो वजन गट – पै. श्रावणी महादेव लव्हटे
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पै. श्रावणी महादेव लव्हटे हिची 53 किलो वजन गटात U-20 अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण तालमीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सर्व यशामागे लक्ष अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक वस्ताद संदीप पाटील सर यांचे मार्गदर्शन, शिस्तबद्ध सराव व मेहनत कारणीभूत ठरली आहे. तसेच तालमीचे संस्थापक हरी अण्णा पाटील, रावसो इंगवले, अरुण पाटील आणि संपूर्ण लक्ष अकॅडमी परिवाराने या पैलवानांना वेळोवेळी दिलेले सहकार्य उल्लेखनीय आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व पैलवान, प्रशिक्षक वस्ताद संदीप पाटील सर, संस्थापक हरी अण्णा पाटील व लक्ष अकॅडमीच्या संपूर्ण संघाचे सर्वत्र अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here