
पन्हाळा प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कै. पांडुरंग भाऊ पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, दिगवडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कै. संभाजी भाऊ पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात उंड्री स्पोर्ट्स, उंड्री संघाने शानदार खेळ करत विजेतेपद (₹५१,००० रोख व चषक) पटकावले.
कोतोली येथील एस. डी. स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद (₹३१,००० रोख व चषक) मिळवले. तसेच रामलिंग स्पोर्ट्स, म्हाळुंगे व जानता राजा स्पोर्ट्स, तिसंगी या संघांना उत्तेजनार्थ चषक व रोख रक्कम प्रदान करण्यात आली.
वैयक्तिक कामगिरीत साहिल मोमीन याने सातत्यपूर्ण व दमदार खेळ करत मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार पटकावला.अक्षय पाटील यास बेस्ट बॅट्समन तर शुभम शेळके यास बेस्ट बॉलर म्हणून गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी श्री. सरदार पाटील (सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी नंदकुमार पाटील, विजय पाटील, रणजित पाटील, मिलिंद पाटील, बाबासो काळे, शिवाजी पाटील,एस.एम.पाटीलसंभाजी मैळे,दिपक पोवार, तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत श्री. रोहित चौगले सर यांनी केले, तर बबन चौगले यांनी आभार प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या सर्व सामन्यांना पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ही स्पर्धा ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना व्यासपीठ देणारी ठरली असून, कै. संभाजी भाऊ पाटील यांच्या स्मृतीस मानवंदना देणारा हा क्रीडोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

