विवेकानंद कॉलेजच्या कृष्णा शेळकेची ‘खेलो इंडिया’साठी झेप शिवाजी विद्यापीठाच्या जलतरण संघात दैदीप्यमान कामगिरी

0
159

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे बी.कॉम. भाग १ मध्ये शिक्षण घेत असलेली गुणवंत जलतरणपटू कु. कृष्णा शेळके हिने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये निवड होत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
शिवाजी विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतरविभागीय जलतरण स्पर्धेत कृष्णाने ५० मीटर व १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात प्रत्येकी दोन सुवर्णपदके, तर २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्यपदक पटकावत आपले कौशल्य सिद्ध केले. या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर तिने शिवाजी विद्यापीठाच्या महिला जलतरण संघात स्थान मिळवत ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी जलतरण स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
याच कामगिरीची दखल घेत तिची ५ वी ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या जलतरण संघात ४×१०० मीटर रिले प्रकारासाठी निवड करण्यात आली आहे. तिच्या या यशामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल कु. कृष्णा शेळके हिला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. तसेच विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, श्री सुरेश चरापले तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन तिला लाभले.
कृष्णा शेळकेच्या या यशामुळे विवेकानंद कॉलेज व शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा परंपरेचा अभिमान अधिकच उंचावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here