
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कसबा सांगाव (ता. कागल) येथील अजिंक्यतारा कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ, वाडदे वसाहत यांच्या वतीने नववर्षानिमित्त तसेच गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू) यांच्या वाढदिवसानिमित्त धरणग्रस्त मर्यादित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून वाडदे वसाहतीत नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्य क्रीडा मैदानाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. यानंतर युवराज पाटील (बापू) यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळणार असून युवकांमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, सरपंच वीरश्री जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकासराव पाटील, बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रविणसिंह भोसले, कागल तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक राजेंद्र माने, माजी सरपंच रणजीत कांबळे, मौजे सांगावचे सरपंच विजयसिंह पाटील यांच्यासह अजित शेटे, सागर माळी, के.बी. पाटील, नेमिनाथ चौगुले, दत्ता पाटील, अमोल माळी, संभाजी कोपार्डे, अरविंद माळी, शंकर पाटील, संतोष गोठणकर आदी मान्यवर, स्पर्धक संघ, ग्रामस्थ व तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, आगामी दिवसांत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






