
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर- कोल्हापुरातील काम आटोपून मोटारसायकलवरुन मित्रा समवेत गावी जात असलेल्या गंवडी कामगाराचा झालेल्या अपघातात मृत्यु झाला. बाबू नाऊ कात्रट (वय 43.राहणार वेतवडे,धनगरवाडा) असे मयताचे नाव आहे.हा अपघात गुरुवार दिनांक 01. जानेवारी रोजी पहाटे साडे तीनच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे
बाबू कात्रट हे गंवडी काम करीत असून त्यांचे कोल्हापूर येथे गंवडी काम चालू होते.कोल्हापुरातील काम आटोपून मोटारसायकल वरुन मित्रा समवेत कोल्हापूरहून गगनबावडाकडे जात होते.त्यांनी मित्राला मध्ये ड्रॉप करून पुढ़े जात असताना कोपार्डे येथील गणेश नारवा येथे पाठीमागून येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ते जखमी झाले.जखमीला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.त्यांच्या पश्च्यात आई-वडील,पत्नी,दोन मुले आणि एक मुलगी आहे.

