
पन्हाळा प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
यांना जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींचे वास्तवदर्शी, प्रामाणिक व प्रभावी वार्तांकन सातत्याने केले आहे. अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या लेखणीने अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून ग्रामीण भागातील समस्या प्रभावीपणे समाजासमोर मांडल्या आहेत.

या मानाच्या पुरस्काराचे वितरण मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी कळे (ता. पन्हाळा) येथे होणाऱ्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात येणार आहे. या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम तसेच पत्रकार संघांचे संस्थापक पी. व्ही. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तानाजी पाटील यांची ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कारासाठी झालेली निवड ही ग्रामीण पत्रकारितेतील मूल्यनिष्ठ कार्याचा गौरव मानली जात असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


