
प्रतिनिधी : जानवी घोगळे
करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील गायरान जमिनीवर सन 2021 मध्ये एकादशीच्या रिंगण सोहळ्यास परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणात, माझ्यासह सर्व वारकरी बांधव व ग्रामस्थांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या न्यायपूर्ण निर्णयाबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो.
वारकरी संप्रदायाच्या शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा, एकादशीचा पवित्र रिंगण सोहळा आणि ग्रामस्थांचे मूलभूत हक्क अबाधित राहावेत यासाठी मी जनतेसोबत उभा राहत ठाम व स्पष्ट भूमिका घेतली होती. श्रद्धा, परंपरा आणि लोकभावनांवर अन्याय होत असताना गप्प बसणे शक्य नव्हते.
या सत्याच्या आणि न्यायाच्या लढ्यात अखेर न्यायालयाने योग्य निर्णय देत लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ केला आहे. लोकभावना, श्रद्धा आणि लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष करणारे नेतृत्व कधीही चुकीचे ठरत नाही, हे या निर्णयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या संपूर्ण लढ्यात माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेल्या सर्व वारकरी बांधवांचे व नंदवाळ ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो.

