
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनाला याच्या वतीने राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन सोमवार, दिनांक ५ जानेवारी पासून करण्यात आले आहे. मुंबई, पुणे यासहित महाराष्ट्रातील विविध १० केंद्रावर ही स्पर्धा सुरू होत आहे.
कोल्हापुरात, गोविंदराव टेंबे रंग मंदिर देवल क्लब येथे दिनांक ५ जानेवारी रोजी बालनाट्य स्पर्धेची सुरुवात होत आहे. यामध्ये कोल्हापुर शहरातील तसेच पेठ वडगाव, आजरा, गडहिंग्लज, जयसिंगपूर वारणानगर, रत्नागिरी, देवगड, चिपळूण, पोफळी, निरबाडे, कुडाळ, चंदगड इत्यादी भागातील नाट्य संस्था सहभागी होत आहेत. कोल्हापूर आणि सांगली हे विभागून केंद्र असून कोल्हापूर केंद्रावर २६ बाल नाट्य आणि सांगली केंद्रावर २४ बालनाट्य होतील. कोल्हापुर केंद्रावर दिनांक १० जानेवारी रोजी स्पर्धा पूर्ण होईल आणि दिनांक १३ जानेवारीपासून सांगली केंद्रावर बालनाट्य स्पर्धा सुरू होईल. रसिक प्रेक्षकांना विनामूल्य बालनाट्य पाहता येतील. शाळांनी आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना बालनाट्याचा आनंद घेण्यासाठी, आणि बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पाठवावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्री बिभीषण चवरे यांनी केले आहे.

