
श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना डॉ. यु.एन. लाड. समवेत डॉ. उषा पवार, डॉ. बी.एन. रावण, डॉ. एस.एस. कुरलीकर, प्रा. संग्रामसिंह मोरे, प्रा. पी.डी. माने व मान्यवर.
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
जागतिकीकरणाच्या युगात व नव्या शैक्षणिक धोरणात खेळाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. वैयक्तिक खेळ व त्यातून मिळणारे यश व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरते. आरोग्यसंपन्न व शिस्तबद्ध जीवनासाठी खेळ अत्यावश्यक असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर खेळाला पर्याय नाही, असे प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. यु.एन. लाड यांनी केले.
ते श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील जिमखाना विभागामार्फत आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. डॉ. बी.एन. रावण होते. प्रमुख उपस्थितीत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सहसमन्वयक डॉ. एस.एस. कुरलीकर, ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ. उषा पवार यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. संग्रामसिंह मोरे यांनी केले, तर आभार प्रा. पी.डी. माने यांनी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

