श्रीपतराव चौगुले कॉलेजची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

0
109

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील ज्युनिअर आर्टस् विभागाची शैक्षणिक सहल नुकतीच उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली. या सहलीत गगनबावडा, रामलिंग, असळज व लखमापूर धरण या पर्यटन, धार्मिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यात आली.
या शैक्षणिक सहलीत इयत्ता ११ वी व १२ वी आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणीद्वारे पर्यटन, धार्मिक परंपरा तसेच जलसंधारण प्रकल्पांविषयी सखोल माहिती घेतली. सहल शिक्षणाबरोबरच अनुभवविश्व समृद्ध करणारी ठरली.
एकदिवसीय सहलीची सुरुवात श्री क्षेत्र रामलिंग येथील दर्शनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम व ऐतिहासिक गगनगड किल्ला येथे भेट देऊन त्या ठिकाणच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक बाबींची माहिती घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी श्रमदान करून सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवले.
यानंतर सहलीतील विद्यार्थ्यांनी लखमापूर लघु पाटबंधारा धरणाला भेट देऊन तेथील पाणी साठवण, जलव्यवस्थापन व नियोजन कार्याची सविस्तर माहिती करून घेतली.
या शैक्षणिक सहलीसाठी संस्थेचे सचिव श्री. शिवाजीराव पाटील तसेच प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सहलीत ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्या डॉ. उषा पवार, सहल प्रमुख प्रा. सिमा पाटील, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. संजीव कुंभार व प्रा. विश्वजा पाटील सहभागी झाले होते.
सहलीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण दिसून आले.
फोटो ओळ :
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील ज्युनिअर आर्टस् विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या शैक्षणिक सहलीत सहभागी विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here