
प्रतिनिधी : जानवी घोगळे
पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया’ (पीआरएसआय) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरची स्थापना व कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजीत पाठक यांनी नुकतीच जाहीर केली आहे. या कार्यकारणी समितीवर श्री. विवेक सिद्ध यांची निवड करण्यात आली आहे. ‘पीआरएसआय’ संस्था १९६६ पासून देशपातळीवर कार्यरत असून जनसंपर्क क्षेत्राचा विकास, जनसंपर्क क्षेत्राबद्दल समजात जागृती, जनसंपर्क मुल्यांची जोपासना, अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान, जनसंपर्क क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जनसंपर्क क्षेत्रातील चांगल्या कामाचा गौरव, जनसंपर्क क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन, जनसंपर्काशी सबंधित विविध साहित्य प्रकाशित करणे इत्यादी विषयांवर पीआरएसआय ही संस्था भारतात १९६६ पासून कार्यरत आहे. नवीन कार्यकारणीत शिवाजी विद्यापीठाच्या अध्यक्षपदी डॉ. निशा मुडे पवार, उपाध्यक्षपदी ‘नँक’चे सल्लागार डॉ.जगन्नाथ पाटील तर सचिव विश्वजीत भोसले यांची निवड झाली आहे. समितीत सदस्य म्हणून वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रताप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, संपादक राजेंद्रकुमार चौगुले, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील प्राध्यापक डॉ.अंबादास भास्के यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.पीआरएसआय ही माध्यम क्षेत्राशी सबंधित ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी व्यावसाईक संघटना आहे. या संस्थेच्या माध्यमातून जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत व्यावसाईक, माध्यम क्षेत्रातील प्राध्यापक, पत्रकार व या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणारे विद्यार्थी यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील तज्ञ मंडळींचे ज्ञान व अनुभव सर्वाना स्थानिक पातळीवर मिळणार आहे. या सर्वात जास्त फायदा पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील विद्यार्थांना होणार आहे.

