
*कोल्हापूर : प्रतिनिधी प्रतिनिधी प्रा मेघा पाटील
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक सन २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ ब मधून सौ. वैशाली अमित पसारे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्या माजी जिल्हा अध्यक्षा, महिला आघाडी – कोल्हापूर जिल्हा महानगर म्हणून कार्यरत राहिल्या असून सामाजिक, राजकीय व महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या अभ्यासू व कार्यकर्तृत्ववान नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे.

ओबीसी महिला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरत असलेल्या सौ. पसारे यांनी महिलांचे सक्षमीकरण, सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच युवक व महिलांसाठी रोजगार संधी निर्माण करणे या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा पदावर असताना त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी अनेक उपक्रम राबवले. महिला बचत गटांना प्रोत्साहन, स्वयंरोजगार मार्गदर्शन, कौटुंबिक हिंसाचार व अन्य सामाजिक प्रश्नांवर मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य तपासणी मोहीम, तसेच गरजू महिलांना मदतकार्य या माध्यमातून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे.

प्रभाग क्रमांक १५ ब मधील नागरी समस्या — पाणीटंचाई, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट्स, तसेच सार्वजनिक सुविधा याकडे विशेष लक्ष देत “विकास, पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद” हे आपले धोरण असल्याचे सौ. पसारे यांनी सांगितले.
निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांना प्रभागातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनुभवी नेतृत्व, सामाजिक बांधिलकी व कार्याचा अनुभव पाहता त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत महिलांचे सशक्त प्रतिनिधित्व वाढविण्याच्या दृष्टीने सौ. वैशाली अमित पसारे यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात असून, येत्या निवडणुकीत त्या प्रभाग क्रमांक १५ ब मधील मतदारांचा विश्वास संपादन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


