

भादोले ता हातकणंगले येथील सार्वकालिक दिप फाउंडेशन यांच्या वतीने 2 रा वर्धापन दिन व ख्रिसमस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळ पासून विविध उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन पास्टर मनोहर चोपडे व सिस्टर अस्मिता चोपडे यांनी केले होते या कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे म्हणाले कीसमाजामध्ये काम करीत असताना आपण समाजाचे काय देणे लागतंय हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे कार्यक्रम मध्ये ख्रिसमस निमित्त प्रभू येशूची प्रार्थना करण्यात आली तर लहान मुलांनी सुंदर डान्स सादर केलेसार्वकालीक दीप फाउंडेशन चे सर्व लीडर व मंडळी उपस्थित होते, प्रमुख उपस्थिती भादोले ग्रामपंचायत माजी सदस्य विक्रम माने सदस्य अमोल कोळी सौ रूपाली कोळी जीनियस इंग्लिश मीडियम स्कूल चे महेश पोळ व मुख्याध्यापिका अर्पणा पोळ व व हिराई हॉस्पिटलचे डॉ. मिलिंद हिरवे व सौ आरती हिरवे उपस्थित होते ,





