केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त वाठार येथे शालेय साहित्य वाटप

0
111

प्रतिनिधी : प्रकाश कांबळे

वाठार येथे प्रकाश कांबळे फाउंडेशन यांच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कन्या शाळा व कुमार शाळा यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सचिन कांबळे,सदस्य सुहास पाटील, आर पी आय तालुकाध्यक्ष अविनाश अंबपकर यांची प्रमुख उपस्थित होते
यावेळी बोलताना प्रकाश कांबळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे शिकून मोठे अधिकारी व्हावे यासाठी लागेल ती मदत देण्यासाठी प्रकाश कांबळे फाउंडेशन सदैव तत्पर असेल यावेळी शशिकांत भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी केंद्रप्रमुख सिद सर,तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पाटील, इंजि अमोल पाटील,माजी सरपंच नारायण कुंभार,सर्जेराव भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत भोसले,रामभाऊ कुंभार,पत्रकार राहुल देडे, पत्रकार किशोर जासूद, आलेश नांगरे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार शिंदे सर यानी केले तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले कार्यक्रमास दोन्ही शाळेचे शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here