श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये ‘रिसर्च मेथडॉलॉजी’वर प्रभावी कार्यशाळा

0
19

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

संशोधन म्हणजे समस्या सोडविण्याची आणि नवीन ज्ञान मिळविण्याची वैज्ञानिक व पद्धतशीर प्रक्रिया असून विद्यार्थ्यांनी प्रश्न निर्माण करून जिज्ञासा जोपासली तरच दर्जेदार संशोधन घडते, असे प्रतिपादन डॉ. एस. एन. गोलगिरे यांनी केले.
श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात
‘रिसर्च मेथडॉलॉजी’ या एकदिवसीय कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील होते. संशोधनातून नवसर्जन घडते व त्याचा मानवजीवनाला उपयोग होतो, असे ते म्हणाले. दुसऱ्या सत्रात डॉ. बी. एन. रावण यांनी “लहान का असेना, पण सातत्यपूर्ण संशोधन करा” असा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षारोपणाने झाले. संस्था सचिव शिवाजीराव पाटील, डॉ. उषा पवार, डॉ. एस. एस. कुरलीकर, डॉ. यू. एन. लाड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. यू. बी. पवार यांनी केले.
फोटो ओळ : कार्यशाळेत डॉ. एस. एन. गोलगिरे यांचा सत्कार करताना सचिव शिवाजीराव पाटील मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here