
कै. सौ. सत्वशीला साळुंखे यांच्या स्मरणार्थ श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, घुंगूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथे शैक्षणिक हितार्थ क्रीडा साहित्य व रोख रक्कम देणगी प्रदान करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. एस. पाटील, श्री. बोरगे सर, श्री. पांडुरंग फिरंगे-पाटील, श्री. पुरुषोतम साळुंखे व ऋतुराज जगताप.
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कै. सौ. सत्वशीला साळुंखे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजिव श्री. पुरुषोतम साळुंखे यांचेमार्फत दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, घुंगूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर या शाळेस शैक्षणिक मदत प्रदान करण्यात आली.यामध्ये क्रीडा साहित्य तसेच विज्ञान साहित्य खरेदीसाठी रोख रक्कम रु. ५,०००/- इतकी देणगी देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासास निश्चितच हातभार लागणार आहे.या कार्यक्रमाचे नियोजन श्री. पुरुषोतम हितेंद्र साळुंखे, श्री. पांडुरंग फिरंगे-पाटील व ऋतुराज जगताप यांनी केले.

