
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर:- स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना मान्यता प्राप्त रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या तांत्रिक सहकार्याने एटीएम विद्यापीठ ग्वाल्हेर. या ठिकाणी होत असलेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या महाराष्ट्र राज्य स्केटिंग संघाच्या स्केटिंग प्रशिक्षक पदी कोल्हापूरच्या राष्ट्रीय पंच व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या स्केटिंग खेळाडू ॲड.धनश्री रामचंद्र कदम व राष्ट्रीय पदक विजेत्या प्रा.ऐश्वर्या मलसर्ज बिरजे यांची महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे .यांच्या वतीने राज्य स्केटिंग संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र नुकतेच क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने त्यांना देण्यात आले. राज्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष पी के सिंग (मुंबई) व उपाध्यक्ष प्रा .डॉ. महेश कदम, डी.एस. बुलंगे(नासिक) यांच्या त्रिसदस्य समिती च्या वतीने या दोघींच्या नावाची घोषणा करण्यात आली. या दोघींना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे. खासदार धनंजय महाडिक. शहर चे आमदार राजेश क्षीरसागर.जिल्हाध्यक्ष अनिल कदम ॲड. धंनजय पठाडे, राष्ट्रीय कोच भास्कर कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

माननीय,
संपादक सो,
आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती.
प्रा. डॉ. महेश कदम.
( जिल्हा सचिव.)

