जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेची चमकदार कामगिरी एक सुवर्ण व दोन कांस्य पदकांची कमाई

0
9

गोवा | प्रतिनिधी

दि. २० डिसेंबर २०२५ रोजी गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या गोवा स्विमिंग असोसिएशन स्टेट लेव्हल स्विमिंग कॉम्पेटिशन मध्ये बेळगाव येथील होतकरू जलतरणपटू भगतसिंग भारत गावडे याने उत्कृष्ट कामगिरी करत एक सुवर्ण व दोन कांस्य पदके पटकावली.

राज्यस्तरीय या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील नामवंत जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भगतसिंगने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत खालीलप्रमाणे यश संपादन केले —

▪️ ५० मीटर IM (Individual Medley) – सुवर्ण पदक
▪️ ५० मीटर बटरफ्लाय – कांस्य पदक
▪️ ५० मीटर फ्रीस्टाईल – कांस्य पदक

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यशाची परंपरा कायम
भगतसिंग गावडे याने यापूर्वीही विविध जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेक सुवर्ण पदके पटकावून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली आहे. अल्पवयातच त्याने जलतरण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

शैक्षणिक व क्रीडा प्रवास
सध्या भगतसिंग हा मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असून, तो के.एल.ई. स्विमिंग क्लब, बेळगाव येथे नियमित व शिस्तबद्ध प्रशिक्षण घेत आहे.

मार्गदर्शन व सहकार्य
या यशामागे त्याला
अजिंक्य मेंडके, राजेश शिंदे, अतुल धुडूम, इम्रान सर, गोर्धन सर, सतीश यादव, संजू सर, महेश सर
यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच के.एल.ई. इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल, कुवेंपूनगर बेळगाव येथील संपूर्ण स्टाफचे सहकार्य लाभले.

प्रोत्साहनाचा हात
तसेच रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर (हिंडलगा) व उमेश कलघटगी यांनी भगतसिंगला सातत्याने पाठिंबा व प्रोत्साहन दिले.

अभिनंदनाचा वर्षाव
भगतसिंगच्या या दैदीप्यमान यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून, शिक्षक, पालक, मित्रपरिवार व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here