मोबाईलचा योग्य वापर करा, वाचनाची गोडी जपा-सरदार पाटील

0
44

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
मोबाईलमुळे वाचनाची आवड कमी होत असली तरी मोबाईलमध्येही अमूल्य ज्ञानसंपदा आहे. त्याचा योग्य वापर केल्यास विद्यार्थी निश्चितपणे आपले ध्येय गाठू शकतात. परिश्रम, अभ्यास व वाचनाची सवय जोपासा आणि आयएएस–आयपीएस अधिकारी बना. तुम्ही अधिकारी झालात तर घर, गाव, विभाग व देश समृद्ध होईल, असे प्रतिपादन पुणे शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पांडुरंग पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे दिगवडे येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. चौगुले यांनी श्रम व संस्कार हे समाजघडणीचे मूळ असल्याचे सांगून आरोग्य व शिक्षण मजबूत असेल तर जीवन निश्चितच उज्ज्वल होते, असे नमूद केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षास पाणी घालून झाली.
दिगवडे गावात गावकऱ्यांच्या सहकार्याने कॉलेजचे क्लार्क बबन चौगुले यांच्या पुढाकारातून हे शिबिर अतिशय उत्तम पद्धतीने आयोजित करण्यात आले.
उपस्थित मान्यवर (चौकट)

  • विशेष लेखा परीक्षक वर्ग १ विजय पाटील
  • ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील
  • प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील
  • सरपंच मारुती सदाशिव पाटील
  • उपसरपंच वृषाली विशाल पोवार
  • सदस्य शिवाजी पाटील, तानाजी पोवार, सगुना पोवार
  • सुमन कुंभार, विद्या कांबळे
  • पोलीस पाटील नंदकुमार पाटील
  • तंटामुक्त अध्यक्ष रमेश जाधव
  • शाळा समिती अध्यक्ष बाबासो काळे
    विद्यार्थी रसिका कुंभार, अश्विनी पाटील, प्रतिक्षा पाटील, श्रीनाथ डवरी तसेच माजी विद्यार्थी दिपक पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
    प्रास्ताविक प्रा. पी. डी. माने, स्वागत डॉ. यु. एन. लाड, पाहुण्यांची ओळख डॉ. भारती शिंदे, आभार बबनराव चौगुले तर सूत्रसंचालन प्रा. जगदीश सरदेसाई यांनी केले.
    एनएसएस समिती सदस्य, ग्रामस्थ, महिला बचत गट, तरुण मंडळे, अंगणवाडी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    फोटो ओळ : मौजे दिगवडे येथील श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना सरदार पांडुरंग पाटील समवेत डॉ. के. एस. चौगुले व मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here