जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुट्टी दिवशीही सुरु

0
9

प्रतिनिधी : जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 23 : राज्यातील महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम -2025 जाहीर झाला आहे. राखीव जागांसाठी निवडणूक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची अंतिम दि. 30 डिसेंबर असून निवडणूक लढविणाऱ्या अर्जदारांची गैरसोय होऊ नये यासाठी गुरुवार, 25 शनिवार, 27 व रविवार, 28 डिसेंबर या सुट्टीच्या दिवशी ‘फक्त निवडणूक विषयक अर्ज’ स्विकारण्याकरिता जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर येथील कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे. फक्त निवडणूक विषयक अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी या करिता उपस्थित रहावे व अर्ज दाखल करुन पोहोच घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य भारत केंद्रे यांनी केले.

विद्यार्थी विषयक व सेवाविषयक अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांचे प्रस्ताव या दिवशी स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व सेवाविषयक अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांनी या दिवशी कार्यालयात गर्दी करु नये तसेच समितीस सहकार्य करावे, असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here