ग्रामीण क्रीडा क्षेत्राला बळ देणार : डॉ. के.एन. पाटील ( कल्लेश्वर स्पोर्ट्स कसबा बीड ” डॉ. के.एन. पाटील चषका ” चा मानकरी )

0
18

सावरवाडी ता.करवीर येथे ” डॉ. के एन पाटील चषक 2025 ” चा मानकरी ठरलेल्या
कल्लेश्वर स्पोर्ट्स कसबा बीड संघाला रोख चषक व रोख बक्षीस देऊन गौरविताना डॉ. के. एन. पाटील व इतर मान्यवर.

प्रतिनिधी : अविनाश काटे

ग्रामीण भागातील युवक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या असतात. आपल्या गावात, गल्लीत एखादी स्पर्धा जिंकल्यावर विविध स्पर्धेत टिकण्याची उमेद वाढते. त्यामुळे जिल्हा, राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याच्या आशा पल्लवीत होतात. ग्रामीण युवकांमध्ये असलेल्या गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा क्षेत्राला बळ देणार, असे प्रतिपादन डॉ. के.एन. पाटील यांनी केले.

सावरवाडी ता.करवीर येथे श्री भैरवनाथ स्पोर्ट्स सावरवाडी यांच्या संयोजनाने ” डॉ. के एन पाटील चषक 2025 ” भव्य फूल स्पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या बक्षीस समारंभप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेमध्ये कल्लेश्वर स्पोर्ट्स कसबा बीड या संघाने ” डॉ. के.एन. पाटील चषका ” सह प्रथम क्रमांकाचे बक्षीस एकवीस हजार रुपये पटकविले. तर श्री भैरवनाथ स्पोर्ट्स सावरवाडी संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.

त्याचबरोबर तृतीय क्रमांक छत्रपती शिवाजीराजे स्पोर्ट्स शिरोली दुमाला, चतुर्थ क्रमांक ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आडूर व पाचवा क्रमांक सांगरुळ स्पोर्ट्स सांगरुळ यांनी प्राप्त केला. स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.

यावेळी सावरवाडी गावचे कृष्णात खाडे, यशवंत दिवसे, विष्णुपंत तळेकर, काशिनाथ जाधव, आकाराम जाधव,सागर कंदले, भारतीय जनता पार्टीचे शरदचंद्र जाधव, निलेश खोपकर यासह क्रिकेट रसिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here