
(प्रतिनिधी) :पांडुरंग फिरींगे
आमदार विनय कोरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सुमारे सव्वा तीन कोटी रुपये निधी मिळवला. हा निधी कोतोली फाटा ते नांदारी रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाला. मात्र एवढा मोठा निधी मिळूनही प्रत्यक्षात रस्त्याचे काम रडत-खडत, अडखळत आणि पूर्णतः बेजबाबदार पद्धतीने सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
रस्त्याच्या निकृष्ट व संथ कामामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडले. अनेकांना गंभीर दुखापत झाली, तर काहींना आपला जीवही गमवावा लागला. इतके होऊनही ठेकेदार आणि संबंधित बांधकाम विभागाला कोणतीही खंत नसल्याचे दिसून येत आहे.
नणुंद्रेतील गटारी ‘जैसे थे’; दुर्गंधी, रोगराई आणि मृत्यू
रस्त्यालगत नणुंद्रे गावातील गटारी आजही जैसे थे अवस्थेत असून, सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी गावात रोगराईने डोके वर काढले आहे. या अस्वच्छतेचा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस म्हणजे या रोगराईमुळे कणेरी येथील एका महिलेचा मृत्यू झाला. हा प्रकार म्हणजे थेट प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे झालेला बळी असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

लेखी तक्रारी करूनही दुर्लक्ष
या गंभीर बाबींबाबत वारंवार लेखी तक्रारी करूनही संबंधित बांधकाम विभाग व ठेकेदाराने गांधारीची भूमिका घेतली आहे. “आम्ही अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या, पण कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही,” असे रूपाली पाटील यांनी SP-9 MEDIA शी बोलताना स्पष्टपणे सांगितले.
थेट आरोप – लोकांच्या जीवाशी खेळ
सार्वजनिक निधीचा अपव्यय, नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ, अपघातांना आमंत्रण देणारे रस्ते आणि रोगराईकडे डोळेझाक – हे सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून, संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
बाईट
पन्हाळा पश्चिम भागात संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे यामुळे ठेकेदार दुर्लक्ष करून आहे.यामुळे रोगराई पसरली आहे याचा नाहक त्रास नणुंद्रे येथील कुटुंबातील सगळ्यांना होत आहे.तरी यापुढे काही अडचण आल्यास याला संबंधित विभाग व ठेकेदार जबाबदार राहणार आहे.
लक्ष्मण तांदळे
युवा संघर्ष सेनेचे अध्यक्ष
जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर या निष्काळजीपणाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.

