
दिगवडे येथील श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. जे. के. पवार; समवेत मान्यवर.
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
विद्यार्थ्यांच्या मन, मनगट आणि मेंदूचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरांची नितांत आवश्यकता आहे. समाजात प्रत्यक्ष वावरल्याशिवाय शिक्षण पूर्णत्वास जात नाही. विकारमुक्त व विकासपूर्ण समाज घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विचारांचे प्रदूषण रोखण्याचे काम करावे आणि महामानवांच्या विचारांचे संस्कार समाजात पोहोचवावेत, असे प्रेरणादायी प्रतिपादन डॉ. जे. के. पवार यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली
यांच्या संयुक्त विद्यमाने “युवकांचा ध्यास ग्रामविकास” या घोषवाक्याअंतर्गत दिगवडे (ता. पन्हाळा) येथे आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. के. एस. चौगुले होते. उद्घाटन सरपंच मारुती सदाशिव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण व वृक्षास पाणी घालून करण्यात आले—पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शिबिराची सुरुवात झाली.
प्रमुख उपस्थितीत प्रा. जी. टी. पाटील, मारुती चौगुले, शिवाजीराव पाटील, कल्पनाताई चौगुले, प्रकाश पाटील, प्रा. वेदिका चौगुले, विजय चौगुले, डॉ. अजय चौगुले, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. उषा पवार, वृषाली पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. पी. डी. माने, स्वागत प्रा. एच. एस. शिरसट, सूत्रसंचालन डॉ. भारती शिंदे यांनी केले, तर आभार डॉ. यू. एन. लाड यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, महिला बचत गट, तरुण मंडळ, अंगणवाडी व आशा सेविका तसेच स्वयंसेवकांची लक्षणीय उपस्थिती होती.

