
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
आरोग्य क्षेत्रातील करिअरसाठी सुवर्णसंधी
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मान्यताप्राप्त व्यवसायाभिमुख नवीन पदवीका अभ्यासक्रम – Advanced Diploma in Medical Laboratory Technology (ADMLT) सुरू करण्यास शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आहे.
आरोग्य व वैद्यकीय प्रयोगशाळा क्षेत्रातील वाढती गरज लक्षात घेता हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी करिअर घडवणारा मैलाचा दगड ठरणार आहे.
अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
कालावधी : पूर्णवेळ १.५ वर्षे
प्रवेशक्षमता : ६० विद्यार्थी
फोकस : आधुनिक मेडिकल लॅब तंत्रज्ञान, प्रात्यक्षिक प्रशिक्षण व रोजगाराभिमुख कौशल्ये
प्रवेश पात्रता
खालील शैक्षणिक अर्हता असलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत :
B.R.M.T., B.Sc. MLT, B.Sc. Biotechnology, B.Sc. Zoology, B.Sc. Microbiology, B.Sc. Microchemistry, B.Sc. Chemistry, B.Sc. Botany, B.Sc. Analytics, B.Sc. Life Science, B.Sc. CLS (Clinical Laboratory Science), B.Voc. (Medical Laboratory Technology)
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : २८ डिसेंबर २०२५
अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लाभलेले मोलाचे सहकार्य
हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था चे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे,
सेक्रेटरी शुभांगी गावडे,
मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे,
आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी,
तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अधिक माहितीसाठी
या अभ्यासक्रमाबाबत अधिक माहितीसाठी अभ्यासक्रम समन्वयक डॉ. टी. सी. गौपाले यांच्याशी विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे थेट संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी केले आहे.

