विवेकानंद कॉलेजच्या वतीने आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धेचे दिमाखात यशस्वी आयोजन

0
45

कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे –
विवेकानंद कॉलेज यांच्या वतीने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाशी संलग्न कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी डॉ. ई. बी. आळवेकर, डॉ. सी. बी. पाटील, कोल्हापूर जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष विजय साळोखे-सरदार, शिवाजी विद्यापीठ निवड समितीचे चेअरमन डॉ. विकास जाधव, स्पर्धा निरीक्षक डॉ. संतोष जाधव, तसेच निवड समितीचे सदस्य डॉ. रणजीत इंगवले, डॉ. एच. ए. नारायणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक – यशवंतराव चव्हाण कॉलेज
द्वितीय क्रमांक – विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर
तृतीय क्रमांक – स. ब. खाडे कॉलेज
चतुर्थ क्रमांक – डॉ. घाळी कॉलेज

या स्पर्धेमधून शिवाजी विद्यापीठाचा पुरुष हॉकी संघ निवडण्यात आला असून, पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी हा संघ सज्ज झाला आहे.

स्पर्धेत मुख्य पंच म्हणून नजीर मुल्ला, तर सहाय्यक पंच म्हणून सागर जाधव, योगेश देशपांडे, राहुल गावडे व श्वेता पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विकास जाधव यांनी केले, तर आभार प्रा. समीर पठाण यांनी मानले. संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी संयोजन प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे तसेच प्रशासकीय सेवक सुरेश चारपले यांनी केले.

या स्पर्धेसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था चे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here