
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
सोनुर्ले (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) — येथील करणसिंह गायकवाड माध्यमिक विद्यालय, सोनुर्ले या विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे सचिव अण्णा पाटील सर यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अण्णा पाटील सर म्हणाले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात श्रीमंती व मालमत्तेपेक्षा आरोग्य अत्यंत मौल्यवान आहे. उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम व क्रीडा स्पर्धांमधील सहभाग हा अनिवार्य आहे. व्यायामाशिवाय चांगल्या आरोग्याला पर्याय नाही. शारीरिक हालचाल हा मनुष्याच्या जगण्याचा मूलमंत्र आहे.”
ते पुढे म्हणाले की, “सध्याचे विद्यार्थी मोबाईलमध्ये अधिक गुंतून राहिल्याने त्यांच्या शरीराची हालचाल कमी होत आहे. यामुळे मेंदूवर ताण येतो व विद्यार्थ्यांमध्ये अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध खेळांत सहभागी होऊन आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे व नियमित व्यायामाची सवय लावावी.”
यावेळी संस्थेचे सचिव व सरपंच बी. एच. कांबळे, मुख्याध्यापक एस.डी पाटील , शिक्षक कांबळे सर, मोहिते सर, पाटील सर, तसेच पाटील मॅडम, संस्थेचे पदाधिकारी व विद्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक पाटील सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले. यानंतर क्रीडा स्पर्धांची यशस्वी सांगता झाली

